शेतकरी विधेयक, हाथरस घटनेचा जामनेर युवक कॉंग्रेसकडून निषेध

जामनेर प्रतिनिधी । केंद्र शासनाने कृषी विधेयक आणि हाथरस येथील मुलीवरी अत्याचाराचा जामनेर युवक काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शेवाळे यांना देण्यात आले.

केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नसुन हे विधेयक शेतकऱ्यांवर घोर अन्याय असुन नुकसानकारक आहे.हा अन्यायकारक कायदा लागु करू नये.भाजप सरकारने हिटलरशाही पद्धतीने शेतकरी कायदा मंजूर करून लोकशाहीचा खुन केला असल्याचा लेखी निवेदनात उल्लेख केला. तसेच हाथरस घटनेचाही निषेध व्यक्त करीत. सामुहिक बलात्कार- खुनाच्या घटनांचा व राहूल गांधी व प्रियंका गांधी यांना झालेल्या धक्का बुक्की व अटकेबाबत युवक काँग्रेसतर्फे निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. ज्योत्स्ना विसपुते, शंकर राजपूत , अशपाक पटेल, दिपक राजपूत, संदिप पाटील, संजय राठोड, शुभम परमार, शुभम पांढरे, सोपान भोई, संजय जैन, शफिक पहेलवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content