जळगाव प्रतिनिधी | शहरात सध्या सुरू असणार्या डागडुजीच्या कामाबाबत आज महापौरांच्या दालनात महापौर आणि उपमहापौरांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कामाची गुणवत्ता राखत वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात आज महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन संकत, शहर अभियंता अरविंद भोसले,विलास सोनवणे,नरेंद्र जावळे, मनीष अमृतकर,प्रकाश पाटील ,संजय पाटील,जितेंद्र रंध्ये, गोपाळ लुळे मराठे साहेब,योगेश वाणी, तसेच मक्तेदारमध्ये नितीन सपके, निरंजन पाटील,विशाल पाटील ,उदय टेकाळे, इतर अनेक मक्तेदार उपस्थित होते.
या बैठकीत शहरात सुरू असणारी डागडुजीची तसेच अन्य कामांबाबत आढावा घेण्यात आला. यात मक्तेदारांनी काही समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने बिल संबंधित थर्ड पार्टी तपासणी रिपोर्ट, कामांना देण्यात येणारा अग्रक्रम या समस्या मांडण्ंयात आल्या. या समस्यांवर मात करून त्यांनी कामाचा वेग वाढवावा असे निर्देश महापौर आणि उपमहापौरांनी दिले.