जळगाव प्रतिनिधी । येथील प्रांताधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खाते अर्थात एसीबीच्या पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतल्याची घटना आज घडल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, तक्रारदाराने प्रांताधिकारी कार्यालयात लाचेची मागणी केल्यामुळे अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती. या नुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून आज दुपारी लाच स्वीकारतांना एकाला रंगेहात पकडले. यात एकाला ताब्यात घेण्यात आले असून यासोबत अजून एक बड्या अधिकार्याची चौकशी करण्यात येत आहे.
याबाबत लाचलुपत प्रतिबंधक खात्यातर्फे अद्याप तरी अटक करण्यात आलेल्याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच )