धरणगाव तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या एक हजार पार

धरणगाव,  प्रतिनिधी । येथील कोवीड केअर सेंटरला संशयित रूग्णांचे तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून यात तालुक्यातून ३९ रूग्ण नव्याने आढळून आले त्यापैकी पळधी खुर्द १० तर झुरखेडा येथे ६ रुग्ण आढळून आल्याची माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली. आज धरणगाव तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा १०३२ झाला आहे.

धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने ३९ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. यात पाळधी बुद्रुक २, हिंगोणे १, बिलखेडा १, बोरगाव बुद्रुक ३, जि. एस. नगर १, ल. मा. वाडा १, पाताल नगरी १, गुजराथी गल्ली १, खत्री गल्ली १, मराठे गल्ली २, वाणी गल्ली १, पेंढारे गल्ली १, रोटवद ३, पाथराड खुर्द १, पिंपळे खुर्द १, चमगाव १, निमखेडा १ असे रूग्ण आढळून आलेत.

आजचे रूग्ण पकडून १०३२ रूग्ण झाले असून यापैकी ३७ रूग्ण मयत झाले, ७९३ रूग्ण बरे झाले असून उर्वरित २०२ रूग्ण हे उपचार घेत आहे. अशी माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली आहे.

Protected Content