जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी नगरातील वासू सपना कॉम्प्लेक्स येथील वॉचमनला काहीही कारण नसतांना काही टवाळखोर मुलांनी शिवीगाळ करून दगडफेक केल्याने त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाल्याची घटना बुधवारी १ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, शाहरूख अली शौकात अली सैय्यद वय २९ रा. छत्रपती शिवाजी नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ते छत्रपती शिवाजी नगरातील वासू सपना कॉम्प्लेक्स येथे वाचमन म्हणून नोकरीला आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे बुधवारी १ मे रोजी मध्यरात्री ते ड्यूटीवर असतांना पहाटे ३ वाजेच्या सुमारास अनोळखी जणांची टोळी तिथे आली. काहीही कारण नसतांना शाहरूख अली यांना शिवीगाळ केली. त्यानंतर अनोळखी ९ जणांनी त्यांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे त्यांच्या दोन्ही पायाला दुखापत झाली. ही घटना घडल्यानंतर शाहरूख अली शौकात अली सैय्यद यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार सकाळी ६ वाजता शहर पोलीस ठाण्यात अनोखळी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ओमप्रकाश सोनी हे करीत आहे.