दाम्पत्याला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीसात तक्रार न देण्यासाठी फोनवरून दाम्पत्याला धमकी दिल्याचा प्रकार भुसावळ शहरातील पंचशिल नगरात बुधवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील पंचशिल नगरात संदीप प्रकाश लवंगे हे आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा शेख शकील शेख सलीम (वय-२६) याच्यासोबत संदीप लंवगे यांच्या पत्नीशी किरकोळ वाद झाला होता. शेख शकील याने संदीप लवंगे यांना फोन करून पोलीसात तक्रार न देण्याची धमकी दिली. तसेच घरासमोर येवून संदीप लवंगे आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर संदीप लवंगे यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख शकील शेख सलीम याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सत्तार शेख करीत आहे.

Protected Content