जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी| जळगाव शहरातील काट्याफाईल परिसरात पती व मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेला शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिता मनोज चव्हाण (वय ५०, रा. काट्या फाईल) या विवाहिता आपल्या पती आणि मुलांसह वास्तव्याला आहेत, मंगळवारी १ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता काहीही कारण नसतांना परिसरात राहणारा शेखर उर्फ काल्या संजय भारोटे वय-२५ हा विवाहितेच्या घरासमोर तलवार घेऊन येत ‘तुझ्या पतीला व मुलाला बाहेर काढ, त्यांना मारुन टाकतो’, अशी धमकी देवून महिलेला शिवीगाळ केली. आजूबाजूचे काही जण तेथे आले असता धमकी देणारा पळून गेला. या प्रकरणी अनिता चव्हाण यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शेखर भारोटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले.