भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या एका तरुणी ही सन २०१७ मध्ये अल्पवयीन असताना भुसावळ शहरातील ठोके नगरातील निर्जळस्थळी नेवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात २१ वर्षीय तरुणी वास्तव्याला आहे. सन २०१७ मध्ये पिडीत तरूणी ही अल्पवयीन असताना कन्हैया सिताराम हरणे रा. भुसावळ या तरुणाने तिच्याशी प्रेम संबंध ठेवून वारंवार अत्याचार केला. दरम्यान नोव्हेंबर २०२३ मध्ये देखील त्याने पीडित तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रयत्न केला. याला पिडीत तरूणीने नकार दिल्याने त्याने व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने पीडित तरुणीने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता संशयित आरोपी कन्हैया सीताराम हरणे रा. भुसावळ याच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.