भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका भागात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील खडकारोड भागात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. तिच्या शाळेच्या गेट समोरून भावेश योगेश तायडे (वय-१८) रा. भुसावळ याने २३ जुलै रोजी सकाळी ८ ते ११ वयाच्या दरम्यान मुलीला तिच्या शाळेच्या गेट समोर भेटून तिला दुचाकीवर बसून भुसावळ रेल्वे कॉटरच्या मागे जाऊन तिच्याशी अंगलट करत लग्नाची आमिष दखवले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा १९ ऑगस्ट रोजी देखील हाच प्रकार केला. दरम्यान १० ऑक्टोबर रोजी देखील तिला पुन्हा लग्नाची आमिष दाखवत घर सोडून माझ्या घरी ये, असे सांगितल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान ही घटना मुलीच्या नातेवाईकांना समजल्यानंतर मुलीसह त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भावेश योगेश तायडे (वय-१८) रा. भुसावळ याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहे.