राजुर घाटात सुरक्षा भिंत कोसळल्याने अपघात

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मलकापूर मार्गावरील राजूर घाटात आज दुपारी ३.३० च्या सुमारास ट्रक पलटी झाला आणि काही क्षणातच सुरक्षा भिंत तोडून दरीत कोसळला. मात्र सुदैवाने ते झाडामुळे काही अंतरावर अडकले. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार मलकापूरहुन बुलढाण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचालकाचा राजूर घाटातील एका वळणावर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला होता. क्रेनच्या साह्याने उभे करण्यात आले आणि नंतर हा ट्रक घाटाची सुरक्षा भिंत तोडून दरीत पलटी झाला. सुदैवाने झाडात हा ट्रक अडकलेला असल्याची माहिती बोराखेडीचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी दिली आहे. दरम्यान घटना स्थळावरील एका नागरिकाने ट्रक पलटी होतानाचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

 

 

Protected Content