१९९३ साली मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार दहशतवादी अबू बकरला अटक

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । १९९३ साली मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार दहशतवादी अबू बकरला अटक करण्यात आली आहे. असून तब्बल २७ वर्षानंतर यूएईमध्ये भारतीय एजन्सीला मोठं यश मिळालं. त्याला लवकरात लवकर भारतात आणावे असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

यूएईमध्ये भारतीय एजन्सीला मोठं यश मिळालं असून तब्बल २७ वर्षानंतर १९९३ साली मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार दहशतवादी अबू बकरला अटक करण्यात आली आहे. याचा फायदा भारतीय तपास यंत्रणेला होणार असल्याचे वक्तव्य सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले आहे. अबू बकरच्या अटकेनंतर आणखी ठोस पुरावे हाती लागण्याची शक्यता असल्याने त्याला लवकरात लवकर भारतात आणावे असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

अबू बकर हा पाकव्याप्त काश्मिरात शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचं प्रशिक्षण देत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्सचं लॅन्डिंग आणि दाऊबसोबत दुबईतून कट रचण्यात बकरचा हात असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. अखेर एका मोठ्या ऑपरेशननंतर अबू बकरला पकडण्यात भारतीय यंत्रणा यशस्वी झाली आहे. २०१९ मध्येही बकरला अटक करण्यात आली होती. मात्र काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. अखेर आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून लवकरच भारतात आणलं जाणार आहे.

Protected Content