फरार आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ प्रतिनिधी । तब्बल आठ वर्षांपासून फरार असणार्‍या आरोपीला आज बाजारपेठ पोलिसांनी गजाआड केले आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात ३० जून २०११ रोजी पो स्टे भाग ५ गुरन-४९८(अ),३५४, ३२३, ५०४, ५०६, ५१०,३४ प्रमाणे दाखल झालेला होता. यातील सुरेश मदनसिंग चितोडिया या आरोपीला फिर्यादी बबिता चितोडीया रा.भुसावळ हिने पैसे न दिल्याने मानसिक व शारीरिक छळ करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. दरम्यान, तब्बल ८ वर्ष पासून फरार असलेला आरोपी नामे सुरेश मदनसिंग चितोडीया वय-४४ रा.बंगलोर येथे राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास पवार यांना मिळाली. यानुसार त्यांनी बाजारपेठचे उपनिरिक्षक दत्तात्रय गुलिग, विकास सातदिवे, समाधान पाटील, ललित बारी असे पथक तयार करून बंगलोर येथे पाठवले होते. आज दिनांक १२ एप्रिल रोजी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला स्नोवसिटी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला न्यायदंडधिकारी बंगलोर येथे हजर करून त्याच्या ट्रान्झीट वारंटची परवानगी घेण्यात आली असून त्याला भुसावळच्या न्यायालयात हजा करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content