जिल्हाधिकार्‍यांची चाळीसगाव पाचोरा व भडगावच्या कोविड केअर सेंटरला भेट

चाळीसगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पाचोरा, भडगाव, चाळीसगाव येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली व तेथील आरोग्य सुविधा, रूग्णांना मिळणार्‍या सोयीसुविधा तेथील अडीअडचणी समजून तर घेतल्याच शिवाय अनेक अडचणीचे निराकरण त्यांनी जागेवरच केले.

ज्या नागरिकांना कोरोना सदृश्य लक्षणे जाणवतील त्यांनी रूग्णालयात जाऊन तपासणी करावी. तसेच यंत्रणेनेही नागरिकांनी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी. नागरिकांमध्ये उपचाराविषयी विश्‍वास निर्माण करून आपण सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर मात करू असा विश्‍वासही व्यक्त केला.

यावेळी पाचोरा येथे आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे तर चाळीसगाव येथे खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांचेसह पोलिस अधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदिंसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Protected Content