अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री घेतली मुख्यमंत्र्यांची भेट;अपक्ष निवडणूक लढवणार

मुंबई (प्रतिनिधी) लोकसभेच्या तिकीटावरुन नाराज असलेल्या काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द करत आपण औरंगाबाद लोकसभेमधून अपक्ष निवडणूक लढवत असल्याचे सांगितले.

 

शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना सत्तार म्हणाले की, मी विरोधी पक्षाचा आमदार असूनही गेल्या साडेचार वर्षांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी मदत केली आहे. म्हणूनच काल रात्री मी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच यावेळी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या घोषित उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारले आहे. सुभाष झांबड यांना पक्षाने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत स्वतः लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभे राहणार असल्याचे सत्तार त्यांनी म्हटले आहे.

Add Comment

Protected Content