अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा

Abdul Sattar Aurangabad

औरंगाबाद (वृत्तसंस्था) खातेवाटप होण्यापूर्वीच शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. कॅबिनेट मंत्रीपद तसेच औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार नाराज होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.

 

अर्जुन खोतकर यांच्याकडून अब्दुल सत्तार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगाबादमधील एका हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांची बैठक सुरु आहे. सत्तार नाराज असल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले. अल्पसंख्याक समुहातून येऊन अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला. कोणत्याही एका जातीच्या जीवावर राजकारण करण्याऐवजी अब्दुल सत्तार यांनी सर्व जातीधर्मात आपले समर्थक निर्माण करून आपले राजकीय वर्चस्व कायम राखून आहेत.

Protected Content