छत्रपती संभाजीनगर जिल्हयांचे नवे पालकमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेते संदीपान भुमरे यांनी संभाजीनगर जिल्हा पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या जिल्ह्याच्या पालमंत्रिपदाची सूत्रे आता मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

भुमरे हे विधानसभेवरील आमदार होते. आमदार असतानाच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. निवडून आल्याने ते खासदार झाले. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे सहाजिकच त्यांना पालकमंत्री पदावरुन बाजूला व्हावे लागणार होते. दरम्यान, उत्सुकता हिच होती की, भुमरे यांच्यानंतर हे पद कोणाकडे सोपवले जाते.

संभाजीनगर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री आता अब्दुल सत्तार असणार आहेत. सत्तार यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचेही पालकमंत्री पद आहे. आगामी विधानसभा तोंडावर आल्याने राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यावर मुख्यमंत्र्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा विश्वासू समजल्या जाणाऱ्या सत्तार यांच्याकडे हे पद दिल्याची चर्चा आहे.

Protected Content