गीताई नगरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  शहरातील शनिपेठ परिसरातील गीताई नगरातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत रविवार, ३० ऑक्टोंबर रोजी रात्री ८  वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील गीताई नगरात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. २८ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ ते ४ वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी घरी दिसून आली नाही, तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र मिळून आली नाही, कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी रात्री आठ वाजता शनिपेठ पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक प्रदीप चांदेलकर हे करीत आहेत.

 

Protected Content