नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेदिवशी दिल्लीतील कॅनोट प्लेस येथील संकट मोचन हनुमान मंदिरात जाऊन आरती करणार असून ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचा पुनरुच्चार खा. नवनीत राणा यांनी केला आहे.
ठाकरें यांच्या ‘मातोश्री’ निवास स्थानसमोर हनुमान चालिसा पठणाचा हट्टप्रकरणी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आ.रवि राणा आणि खा.नवनीत राणा यांची तुरुंगातून जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर दोन तीन दिवस लीलावती रुग्णालयातील उपचारानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची राणा दाम्पत्याने राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर आज दुपारी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करीत आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करीत आज राणा दाम्पत्याने नवी घोषणा केली आहे.
कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढविणार?
नवनीत राणा म्हणाल्या कि, बाळासाहेबांनी पदाची लालसा नव्हती त्यामुळे त्यांनी मृत्यूपर्यंत एकही निवडणूक लढविली नाही. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदाची लालसा आहे. म्हणून तुम्ही निवडणूक लढा. निवडणुकीच्या मैदानात उतरुन निवडणूक लढतील काय? हा माझा प्रश्न मुख्यमंत्र्यांना असून त्यांनी १४ तारखेच्या मुंबईच्या बीकेसी संकुलात होणाऱ्या सभेत ते जर निवडणूक लढणार असतील तर कोणत्या मतदारसंघातून या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
मुख्यमंत्री ठाकरेंच्या मुंबईच्या सभेदिवशी मी दिल्लीत असून १४ तारखेला दिल्लीतील कॅनोट प्लेसच्या संकट मोचन हनुमान मंदिरात जाऊन आरती करणार, आणि हे संकट महाराष्ट्रावर आलेले संकट व्हावे, अशी हनुमानचरणी प्रार्थना करणार आहे. हे मात्र नक्की की मी तुमच्याविरोधात निवडणूक लढविणार, असून १४ तारखेच्या सभेत कोणत्या मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढणार हे स्पष्ट करा, असे आव्हान खा. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.