आजाराला कंटाळून तरुणाने घेतला गळफास

suicide pro.......

जळगाव प्रतिनिधी | समता नगर येथील 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवाज शहा चांद शहा तडवी वय 27 रा. समतानगर येथील तरुणाने आजाराला कंटाळून रविवारी (दि. 7 जुलै) रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मयत नवाज तडवी याचा मुलगा आजारी असल्याने राजेश पाटील यांच्या दवाखान्यात ऍडमिट होता. पत्नीला घरून जाऊन येतो असे सांगून गेल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मयताच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. याबाबत रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास संभाजी पाटील करीत आहे.

Protected Content