यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आधार केंद्र बंद असल्यामुळे आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी २०२२ साठी ई केवायशी करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या आधार कार्ड शी मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे असल्याने सर्व आधार केंद्रांवर वयोवृद्ध शेतकरी बांधव तसेच वयोवृद्ध महिला मंडळीची धावपळ सुरु होती. कारण ई केवायशी साठी शासनाने ३१ मार्च ही शेवटची तारीख दिल्याने नागरिक आपआपल्या परीने मिळेल त्या जवळच्या आधार केंद्रांत जाऊन आधार शी मोबाईल नंबर लिंक करत होते. मात्र शुक्रवारी सकाळी लोकांनी आधार लिंक साठी नंबर लावून बसले असता १० वाजेला त्यांना सांगण्यात आले की आधार कार्डच्या मुख्य कार्यालयातुन आमचे सर्वर बंद करण्यात आले आहे. त्यावर तालुक्यातील सर्वच ठिकाणी आधार मशिन बंद करण्यात आल्याने लोकांची चांगलीच पळापळ होत आहे.
एकीकडे ३१ मार्च ही अखेरची तारीख दिली तर दुसरीकडे आधार केंद्र बंद असल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. शेतकरी राजाला आसामानी संकटामुळे वारंवार अडचणीना सामोरे जावे लागते. त्यात शासनाकडून तुटपुंजी मदत योजना मार्फत मिळते खरी मात्र अशा अडचणीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने यावर तात्काळ मार्ग काढून तालुक्यातील सर्व आधार केंद्र सुरू करण्यात यावे, याकडे जिल्हाधिकारी जळगाव, यावल तहसिलदार तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी वेळीच लक्ष देऊन समस्या सोडवावी अशा व्यथा प्रसार माध्यामाकडे आधार केद्र चालकांनी मांडल्या आहे.