जिल्हा परिषदेतर्फे ज्योती राणे यांना “आदर्श शिक्षिका” पुरस्कार जाहीर

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील साळवा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील उपशिक्षिका तसेच उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षिका, कवयित्री, गुणी गायिका तसेच नियोजित लेवा गणबोली साहित्य संमेलनातील आयोजन समिती सदस्या ज्योती राणे (पाटील) यांना जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा “आदर्श शिक्षिका” पुरस्कार जाहीर झाला आहे.

ज्योती राणे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना कलावंत, सामाजिक कार्यकर्ते तसेच लेवा गणबोली साहित्य मंडळाचे सचिव तुषार वाघुळदे आधी उपस्थितीत होते. राणे यांनी काव्य तसेच विविधवल स्पर्धेत भाग घेऊन आतापर्यंत जवळपास दीडशे सन्मानपत्र आणि शिल्ड प्राप्त केल्या आहेत . राणे हिस पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी नेहा वाघुळदे , संजय पाटील , डॉ.प्रभात चौधरी, शुभांगी सरोदे आदींनी स्नेहमय शुभेच्छा दिल्यात. शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करताना सदैव नाविन्यपूर्ण उपक्रमाला सहकार्य करेल आणि शाळेचे नाव उंचावेल अशा भावना राणे यांनी व्यक्त केल्यात .

Protected Content