शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समोर तरुणाची दुचाकी लांबविली

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरून एका तरुणाची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी ८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १३ मे रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत सुरेश सपकाळे वय-३७, रा. धामणगाव जि. जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान बुधवार ८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता भरत सपकाळे हा त्याची दुचाकी (एमएच १९ डीबी १३८२) ने जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आला होता. त्यावेळी त्याने महाविद्यालयासमोर मेन गेट जवळ दुचाकी पार्क करून लावली. पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सोमवारी १३ मे रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव देऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी हे करीत आहे.

Protected Content