सिद्धेश्वर नगरातून तरुणाची दुचाकी लांबविली

वरणगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील सिद्धेश्वर नगरातून एका मजुराची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी २० एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता उघडकीला आली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शैलेंद्र जगन्नाथ जमदाडे वय -५० रा.सुसरी ता भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. शनिवारी २० एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता ते वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगर येथे दुचाकी (एमएच १९ बीएच ४८२) ने आले होते. त्या ठिकाणी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यांना दुचाकी कुठेही मिळून आले नाही, अखेर सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार श्रावण जवरे हे करीत आहे.

Protected Content