चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील हुडको कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात शनिवारी २३ मार्च रोजी दुपारी १ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अफजल शेख मेहबूब वय-२६, रा. हुडको कॉलनी, चाळीसगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून वेल्डिंग काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. त्याच्याकडे (एमएच २० एक्यू ३८१) क्रमांकाची दुचाकी आहे. १८ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर पार्क करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. दुसऱ्या दिवशी मंगळवार १९ मार्च रोजी पहाटे ४ वाजता दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही, अखेर शनिवारी २३ मार्च रोजी दुपारी १ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे हे करीत आहे.