महिलेला अश्लिल शिवीगाळ प्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी परिसरातील रहिवासी महिलेला ऑगस्ट महिन्यापासून फोनवरुन अश्‍लिल शिवीगाळ करणार्‍या एकावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार , गणेश कॉलनी परिसरातील एका कॉलनीत ५० वर्षीय महिला वास्तव्यास असून ती घरकाम करते. १४ ऑगस्ट २०२० पासून आजपावेतो तिला भोकरदन तालुक्यातील जाफ्रराबाद येथील संदीप सुधारकर भवर हा त्याच्या ९२७१३९२००० या मोबाईल क्रमांक वरुन वारंवार फोन करतो. तसेच अश्‍लिल शिवीगाळ करुन तुझ्या मुलीला धंद्यावर बसव, तिची भाड खा, तुझे भरपूर यार आहेत, त्यच्याकडे जावन धंदा करते, लॉजेवर जाते, असे घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत असून महिलेल मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत आहे. तसेच मानसिक त्रास देवून महिलेसह तिच्या मुलीला मारुन टाकण्याची धमकी देतो. असे तक्रारीत नमूद आहे. अशा आशयाच्या महिलेच्या तक्रारीवरुन संदीप सुधाकर भवर याच्या विरोधात जिल्हापेठ पोलिसात भादवि कलम २९४, ५०९, ५०४, ५०६, ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शरीफ शेख हे करीत आहेत.

Protected Content