रावेरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

रावेर, प्रतिनिधी | मंत्री नवाब मलिक यांचा पुतळा जाळून जोरदार निदर्शने करत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:०० ते ५:३० वाजताच्या सुमारास भाजपा कार्यालयासमोर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा पुतळा जाळून जोरदार निदर्शने केली. तसेच देशद्रोही नवाब मलिक यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्या अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिस स्थानकाची परवानगी न घेता हे निदर्शने करण्यात आली. मात्र कोरोनाचे सावट अद्याप पहायला मिळत असल्याने नियम लागू आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सफौ राजेंद्र करोडपती यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस स्थानकात भाजपा युवा मोर्चा श्रीकांत वसंत महाजन, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष महेंद्र पाटील, प्रमोद चौधरी, नितीन पाटील, भुषण पाटील, जितेंद्र पाटील, सचिन पाटील, लहु जाधव, बाळा आमोदकर, विजय पाटील, राहुल व इतर नऊ दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Protected Content