फैजपूर येथे विकास कामांचे भूमिपूजन

फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपूर येथील नगरविकास निधी अंतर्गत विविध विकास कामांच्या भूमीपूजनचा कार्यक्रम आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते गुरूवारी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.

शहरातील ताहा नगर मध्ये गुलाम मौलाना यांच्या घरापासून ते उर्दू शाळेपर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण, मिर्ची मैदान भागात रस्ता काँक्रीटीकरण, लक्ष्मी नगर परिसरात रस्ता काँक्रीटीकरण, फैजपूर- यावल रोडवरील वृदावन कॉलनीत रस्ता ट्रिमिक्स कॉक्रिटीकरण, फैजपूर न्हावी दरवाजा पासून ते तडवी मशीदपर्यंत  ट्रिमिक्स कॉक्रिटीकरण या कामांचा शुभारंभ आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते करण्यात करण्यात आले.

याप्रसंगी नगरअध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष नयना चौधरी, गटनेते मिलिंद वाघुळदे, गटनेते कलिम खान, हैदर खान मण्यार, गटनेते शेख कुर्बान, नगरसेवक हेमराज चौधरी, देवेंद्र बेंडाळे, केतन किरंगे, रशीद तडवी, नगरसेविका नफिसाबी इरफान, सायमाबी मलक आबिद, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले, इरफान मेंबर, जी. पी. पाटील, दीपक होले, ठेकेदार कलिम खाटीक, संजय वाणी, रामराव मोरे, वसीम तडवी, फारुख शेख  यांच्यासह गावातील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Protected Content