तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी भागात असलेल्या रामदेव बाबा मंदिराजवळ तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी रामदेव बाबा मंदिराजवळ एक तरुण बेकायदेशीररित्या हातात तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली, त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या, पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील, पोलीस नाईक किरण धनगर यांच्यासह पोलिसांनी दुपारी २ वाजता कारवाई करत संशयित आरोपी समीर समशेर तडवी (वय-२०,) रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव याला अटक केली, त्याच्याजवळ असलेली ४ हजार रुपये किमतीची २८ इंच लांबीची तलवार हस्तगत केली आहे. याबाबत पोलीस नाईक किरण धनगर यांची फिर्यादीवरून संशयित आरोपी समीर समशेर तडवी (वय-२०) रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Protected Content