यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिकांवर लागणारे फवारणीचे विषारी औषध घेतलेल्या तरूणाचा जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विषारी औषध घेण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सोमवारी २४ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भूषण अशोक पाटील (वय-३३) रा. सावखेडा ता. यावल असे मयत तरूणाचे नाव आहे.
भूषण पाटील हा यावल तालुक्यातील सावखेडा येथे आई, वडील आणि मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. रविवारी २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता त्याने राहत्या घरी पिकांसाठी लागणारे फवारणीचे औषध सेवन केले. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईक व मित्रपरिवार यांनी तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रात्री ८ वाजता त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. सोमवारी २४ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक राजेश पदमार आणि प्रशांत सैंदाणे करीत आहे.