धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील बांभोरी गावात दुचाकी लावण्याच्या कारणावरून एका तरुणाला व त्याच्या कुटुंबाला जीवेठार मारण्याची धमकी देत धारदार चाकूने वार करून दुखापत केल्याची घटना बुधवारी १९ जून रोजी रात्री ८ वाजता घडली होती. या प्रकरणी धरणगाव पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भूषण राजेंद्र सोनवणे वय 22 रा.बांभोरी ता. धरणगाव हा तरुण आपल्या पत्नी आणि आई-वडिलांसोबत वास्तव्याला आहे. दरम्यान त्याच्या घरासमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरून बुधवारी १९ जून रोजी रात्री ८ वाजता शेजारी राहणारा पिंटू रमेश सपकाळे यांच्यासोबत वाद झाला. त्यानंतर त्याने भूषण सोनवणे यांच्यासह त्याचे आई वडील आणि पत्नी यांनान जीवेठार मारण्याची धमकी देत हातातील धारदार चाकूने वार करून भुषणला जखमी केले. दरम्यान या घटनेबाबत तरुणाने धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुरुवार २० जून रोजी दुपारी २ वाजता मारहाण करणारा पिंटू रमेश सपकाळे रा. बांभोरी याच्या विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन करीत आहे.