Home Uncategorized परस्पर बँक खात्यातून पैसे काढून तरूणाची फसवणूक !

परस्पर बँक खात्यातून पैसे काढून तरूणाची फसवणूक !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विद्यूत कॉलनी येथे राहणाऱ्या तरूणाच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने १ लाख ५८ हजार ६६० रूपये परस्पर काढून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस जितेंद्र पाठक वय ३३ रा. विद्यूत कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वस्तव्याला आहे. ५ एप्रिल ते २६ जून २०२५ या कालावधीत त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर पध्दतीने एकुण १ लाख ५८ हजार ६६० रूपये काढून घेवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने अखेर बुधवारी २० ऑगस्ट रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound