जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामनगर परिसरात एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन १९ वर्षीय तरुणाला तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील महादेव मंदिर परिसरात अरमान रईस बागवान हा तरुण राहतो, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अरमान हा आमच्याकडे पाहतो, या कारणावरुन त्याला आकीब पटेल याच्या दोन जण अशा तीन जणांनी सोमवार, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता रामनगर परिसरातील रस्त्यावर मारहाण केली, यादरम्यान चाकूसारख्या लोखंडी हत्याराने अरमान याच्या डोक्यावर, पाठीवर व छातीवर मारहाण करुन दुखापत केली, या घटनेत अरमान बागवान हा जखमी झाला आहे, याप्रकरणी अरमान याने दिलेल्या तक्रारीवरुन आकीब पटेल याच्यासह इतर दोन जण अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.