उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला बॅटने मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसनवारीने दिलेले ६५ हजार रूपये मागितल्याचा रागातून भुसावळातील तरूणाला लाकडी बॅटने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सुप्रीम कॉलनी घडली होती. याप्रकरणी आज सायंकाळी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “शहजादा सलीम पटेल (वय-३८) रा. आयान कॉलनी, भुसावळ हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. फैजपूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षक म्हणून नोकरीला आहे. त्यांचे वडील सलीम हबीब पटेल यांनी इकबाल सलीम पटेल रा. पोलीस कॉलनी, जळगाव याला हातउसनवारीने ६५ हजार रुपये दिले होते. दिलेल्या पैशांसाठी शहजादा पटेल यांनी इकबाल पटेल याला अनेकवेळा फोन केले परंतू त्याचा फोन बंद होता.

दरम्यान २७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शहजादा पटेल हे त्यांचे वडील सलीम हबीब पटेल यांना घेऊन दुचाकीने जळगाव येथील पोलीस लाईनमध्ये इकबाल पटेल याला भेटले व पैसे मागितले. इकबाल याने शिवीगाळ व हुज्जत घातली. त्यानंतर शहजादा हा दुचाकीजवळ जात असतांना इकबाल सलीम पटेल याने त्याच्या हातातील लाकडी बॅटने पायावर जोराने मारली. यात पायाच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाल्याने त्यांना भुसावळातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारानंतर अखेर शहजादा पटेल यांच्याखबरीवरून आज गुरुवार, दि. २१ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी एकबाल सलीम पटेल रा. पोलीस कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content