जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात पाणी भरण्याच्या कारणावरून शिरसोली येथील तरूण शेतकऱ्याला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, गजानन आत्माराम फुशे (वय-२८)रा. शिरसोली प्र.न. ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे तालुक्यातील दळे शिवारात शेती आहे. त्यांच्या शेताच्या बाजूला दिपक नारायण फूशे यांचे शेत आहे. दोघांचे शेतात सामायिक विहिर असल्याने अडीपाळीने पाणी ते शेतात भरत असतात. दरम्यान ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सामायिक विहीरीतून शेतात पाणी भरण्याच्या कारणावरून गजानन फूशे या तरूणाला त्यांचे नातेवाईक दिपक नारायण फूशे आणि नारायण रामदास फूशे दोन्ही रा. शिरसोली ता.जि.जळगाव यांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. दरम्यान गंभीर दुखापत झाल्याने त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडीच महिने उपचार घेतल्यानंतर शनिवार ३० एप्रिल रोजी गजानन फूशे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दिपक नारायण फूशे आणि नारायण रामदास फूशे दोन्ही रा. शिरसोली ता.जि.जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक समाधान टहाकळे करीत आहे.