जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शास्त्री नगरात राहणाऱ्या एका तरूणाला पैसे मागितल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने व लोखंडी पाईपाने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उदय रामराव सराफ (वय ३३, रा. शास्त्रीनगर) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चहापान दुकान चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास उदय सराफ हा शास्त्री नगरातील दुकानाजवळ उभा असतांना त्याठिकाणी आदेश सपकाळे, भावेश सपकाळे, तेजस हटकर, भोजराज पवार हे आले. त्यांनी उदय सराफ या तरुणाला पैसे मागितले. त्याच कारणावरुन त्यांच्या वाद होवून चौघांनी उदय याला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत चौघांनी कोयता, चाकू आणि लोखंउी रॉडने वार करून गंभीर जमखी केले. दरम्यान, तरुणाने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन बुधवारी ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता आदेश सपकाळे, भावेश सपकाळे, तेजस हटकर, भोजराज पवार (सर्व रा. शिवाजी नगर) यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रवीण जगदाळे करीत आहे.