जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तरसोद येथे काहीही कारण नसतांना दारूच्या नशेत तरूणाला विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी २१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता एकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, साहेबराव बापू पवार (वय-३८) रा. आंबेडकर नगर, तरसोद ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. वेल्डींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. १९ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास साहेबराव पवार हा त्यांच्या घराच्या ओट्यावर बसलेला असतांन गावात राहणारा विजय मारूती सावकारे हा दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करू लागला. याचा जाब विचारला असता त्याने हातातील लोखंडी विळा तरूणाच्या डोक्यात टाकून गंभीर जखमी केले. हा प्रकार घडल्यानंत तरूणाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. साहेबराव पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी २१ जुलै रोजी संशयित आरोपी विजय सावकारे यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलियार खान करीत आहे.