यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शिवीगाळ करत असल्याचा संशयातून दोन जणांनी तरूणाला लाकडी दांडुक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील टेंभीकुरण येथे घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार १५ जुलै रोजी दुपारी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोविंदा राजेश सोनवणे (वय-२५) रा. टेंभीकुरण ता. यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १० जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमासार गोविंदा सोनवणे हा त्याचा भावाशी भांडण करत होता. दरम्यान, शेजारी राहणारा अरूण संतोष भांमरे आणि प्रविण संतोष भामरे यांना वाटले की आपल्याला शिवीगाळ करत असल्याचा संशय केला. त्यावरून गोविंदा सोनवणे आणि त्याचा भावाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी शुक्रवारी १५ जुलै रोजी दुपारी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बालक बाऱ्हे करीत आहे.