हिंगोणे ग्रामस्थांनी घरा बाहेर पडू नये ; प्रशासनाचे आवाहन

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा गावात काल कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्याने प्रशासनाने अतिदक्षता घेतली आहे. उपजिल्हाधिकारी रविन्द्र भारदे आणि फैजपुर विभागाचे प्रांत आधिकारी डॉ अजीत थोरबोले यांनी हिंगोणा गावास भेट देवुन परिस्थितीचा आढावा घेतला

यावल तालुक्यातील हिंगोणा गावात काल दिनांक १२ जुन रोजी पोस्ट गल्लीतील एक २६ वर्षीय महीला ही कोरोना बाधीत असल्याचे चाचणी अहवालात निष्पन्न झाले आहे. महीला राहात असलेल्या परिसराला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषीत करण्यात आले आहे. या प्रतिबंधीत क्षेत्रात राहणाऱ्या नागरीकांनी शासनाने दिलेल्या शिस्तीचे व आदेशाचे काटेकोर पालन करावे असे कळकळीचे आवाहन उपजिल्हाधिकारी रवीन्द्र भारदे यांनी केले आहे. याप्रसंगी प्रांत अधिकारी डॉ . अजित थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर, हिंगोणा ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच महेश राणे, गावातील कोतवाल सुमन हर्षल आंबेकर, आशा वर्कर अंगणवाडी सेविका, मदतनिस हे याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी प्रांत अधिकारी डॉ. थोरबोले यांनी सर्व उपास्थितांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर घ्यावयाची काळजी संदर्भात मार्गदर्शन केले. दरम्यान, ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी, कुठलेही अती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जावु नये घरात रहावे सुरक्षीत रहावे असे आवाहनही त्यांनी केले.

Protected Content