धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील गौतम नगरात राहणाऱ्या महिलेचे बंद घर फोडून घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकुण ५४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैशाली भरत पवार (वय-३५ रा. गौतम नगर, धरणगाव) या महिला आपल्या परिसरासह वास्तव्याला आहे. २९ डिसेंबर रोजी ते ६ जानेवारी दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून ४० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार सोमवारी ६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता चोरी झाल्याचा प्रकार उघडकीला आला. त्यानंतर महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ जनार्दन पाटील हे करीत आहे.