जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील अपना ज्यूस सेंटर समोरून महिलेची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी तीन वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, यमुना अशोक पाटील वय-४९, रा. पटेल कंपनी जवळ, पंढरपूर नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्या शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएन १४०३) ने जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथे आलेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दुचाकी ही गोलाणी मार्केट येथीलअपना ज्यूस सेंटर समोर पार्किंगला लावली होती. दरम्यान ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा शोध घेतला, परंतु दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी रविवारी २८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहर पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गजानन बडगुजर करीत आहे.