रस्त्यावर लावलेल्या दुचाकीचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील रस्त्यावर पार्किंगला लावलेल्या दुचाकीचे हेडलाईट तोडून नुकसान केल्याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख रज्जूद्दीन शेख रहिमुद्दिन (वय-५८) रा. चौपाल मोहल्ला, नशिराबाद जळगाव हे खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार १३ जुलै रोजी दुपारी ते (एमएच १० सीएल ८०१०) दुचाकीने नशिराबाद ते उमाळा दरम्यान असलेल्या वाकी धरणाजवळ आले होते. त्यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला पार्कींग करून लावली आणि शेत शिवारात फेरफटका मारण्यासाठी गेले. फिरून आल्यानंतर त्यांना त्यांची दुचाकीचे हेडलाईट व फायबर तोडून नुकसान केल्याचे दिसून आले. उमेश मनोहर धनगर आणि चंदू एकनाथ धनगर दोन्ही रा. नशिराबाद ता.जि.जळगाव यांनीच नुकसान केल्याचा संशय व्यक्त केला. याबाबत शेख रज्जूद्दीन यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून उमेश धनगर आणि चंदू धनगर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.

Protected Content