जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तांबापूरा मच्छीमार्केट परिसरात शौचासाठी गेलेल्या मुलाला हकलून दिल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेवर धारदार शस्त्राने वार करीत जखमी केल्याची घटना शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील तांबापूरा परिसरातील मच्छी मार्केटजवळ अफसाना सलीम अन्सारी या वास्तव्यास आहे. शनिवार १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा हा शौचासाठी त्यांच्या घरासमोर असलेल्या नालीजवळ गेला होता. यावेळी सद्दाम खाटीक यांनी त्याला हाकलून लावले. अफसाना अन्सारी या त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या असता, सद्दाम खाटीक याच्यासह त्याचे वडील व भाऊ हे त्यांना शिवीगाळ करु लागले. याचवेळी सद्दामच्या पत्नीने घरातून धारदार वस्तू आणून ती खाटीक यांच्या हातात दिल्याने खाटीकने महिलेच्या डोक्यावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. याप्रसंगी अन्सारी यांची जाउ अनवारी सलामी अन्सारी, सासू मेमुताबी ईमाउद्दीन अन्सारी, दिराणी समीता सलामी अन्सारी हे वाद सोडविण्यासाठी गेले असता, त्यांना देखील खाटीक यांची पत्नी, वडील अकिल खाटीक, भाऊ आशिस खाटीक यांच्याकडून लाथाबुक्क्यांसह लाठीकाठीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जखमी महिलेच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.