जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील मदानीनगर परिसरात राहणाऱ्या महिलेला काही कारण नसताना अनोळखी नंबरवरून फोनवर अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सोमवार ९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर शहरातील मदानी नगर परिसरात ३७ वर्षीय महिला आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. ३ जानेवारी रोजी रात्री १० वाजता सुमारास एका अनोळखी नंबरवरून महिलेला फोन आला. मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने सुरुवातीला बाईचा आवाज काढून महिलेशी बोलू लागला. त्यानंतर महिलेला अश्लील शिवीगाळ करून पतीला मारहाण करू व ऑडिओ क्लिप व्हायरल करून बदनामी करू अशी धमकी दिली. या संदर्भात महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात सोमवारी ९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बिऱ्हाडे करीत आहे.