जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिलखेडा शेत शिवारात रस्त्याच्या वापराच्या वादावरून एका महिलेला शिवीगाळ करत हात पकडून विनयभंग केल्याची घटना मंगळवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील पिलखोडा गावात ५३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांचे पिलखेडा शिवारातील शेत गट क्रमांक २२ मध्ये शेत आहे. दरम्यान मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता महिलाही शेतात गेले असताना रस्त्याच्या वापराच्या वादावरून प्रकाश धोंडू कोळी याने महिलेला शिवीगाळ करत लाकडी दांडका घेऊन महिलेच्या अंगावर धावून आला. त्यानंतर शांताराम चैत्राम कोळी, महेंद्र शांताराम कोळी आणि जितेंद्र शांताराम कोळी यांनी महिलेला शिवीगाळ करून हातपाकडून विनयभंग केला आहे. दरम्यान या घटनेनंतर महिलेने दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रकाश धोंडू कोळी, शांताराम चैत्राम कोळी, महेंद्र शांताराम कोळी आणि जितेंद्र शांताराम कोळी चौघे रा. पिलखेडा ता. जळगाव या चौघांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.