वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील तळवेल गावामध्ये जुन्या पैशांच्या वादातून एकाला शिवीगाळ करून त्याच्या पत्नीला दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. या संदर्भात दुपारी १२ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील बाजीराव कोळी वय-४२, रा.तळवेल ता.भुसावळ हे आपल्या पत्नी वंदना कोळी यांच्यासोबत वास्तव्याला आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी सुनील कोळी यांनी गावातील विश्वास पंढरी कोळी याच्याकडून ट्रॅक्टर विकत घेतले होते. त्यावेळी ५० हजार रुपये रोख दिले होते, परंतु व्यवहार न झाल्याच्या रागातून विश्वास पंढरी कोळी आणि त्याची शोभा विश्वास कोळी या दोघांनी सुनील कोळी याला शिवीगाळ करत त्याची पत्नी वंदना कोळी यांना दगड मारून जखमी केले. ही घटना रविवारी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. यासंदर्भात सुनील कोळी यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुपारी १२ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विश्वास पंढरी कोळी आणि शोभा विश्वास कोळी दोन्ही रा. तळवेल ता.भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव हे करीत आहे.