जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोकळ्या जागेत पत्रे आडवे लावल्याच्या कारणावरून पतीसह महिलेला शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केला तर तिच्या मुलाचा मोबाईल, अंगावर वरील दागिने गहाळ होवून घराच्या दरवाजांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार ७ मार्च रोजी रात्री १० वाजता घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील बिलाल चौकात ३६ वर्षी महिला ही घरी असतांना त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पत्रे आडवे लावल्याच्या कारणावरून ७ मार्च रोजी रात्री १० वाजता गल्लीतील काहींनी त्यांच्यासह त्यांच्या पतीला शिवीगाळ करून विटाने मारहाण केली. तर जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केला आणि घरातील दरवाजाचे नुकसान केले. या हाणामारीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हरवून नुकसान झाले. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने शनिवारी ९ मार्च रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात शेख हारूण शेख अमीर, यास्मिन बी शेख हारूण, अमीरोद्दीन कुतुबुद्दीन शेख, रफिक शेख अमीर, सागरा शेख युनूस, साफियाबी शेख हारूण, जोहराबी युसूफ खान, युसूफ खान अय्युब खान, अय्युब खान समशेर खान आणि सोहेल शेख सर्व रा. तांबापूरा, बिलाल चौक यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.