बहाळ गावातून पाच वर्षाच्या मुलासह महिला झाली बेपत्ता

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव गावातील बहाळ गावातून २६ वर्षीय महिला आपल्या ५ वर्षाच्या मुलाला सोबत घेवून चाळीसगाव येथे शिलाई मशीनचा फार्म भरून येते असे सांगून सोमवारी २० मे रोजी सकाळी १०.३० वाजेपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मेहुणबारे पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. चंदा समाधान भोई वय २६ आणि चैतन्य समाधान भोई वय-५ दोन्ही रा. बहाळ ता. चाळीसगाव असे बेपत्ता झालेल्या मायलेकाचे नाव आहे.

मेहुणबारे पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावात समाधान संतोष भोई हे आपल्या पत्नी चंदा आणि मुलगा चैतन्य यांच्या सोबत वास्तव्याला आहे. सोमवारी २० मे रोजी सकाळी १०.३० वाजता चंदा यांनी चाळीसगाव येथे शिलाई मशीनचा फार्म भरून येते असे सांगून पाच वर्षाचा मुलगा चैतन्य याला सोबत घेवून घरातून निघून गेल्या. सायंकाळ पर्यंत महिला या घरी आल्या नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी दोघांचा शोध घेवून माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी २१ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता मेहुणबारे पोलीसात खबर देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अनवर तडवी हे करीत आहे.

Protected Content