एका श्रीरामासाठी दुसर्‍या श्रीरामाचा अनोखा संकल्प !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी- राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या विजयासाठी श्रीराम इंगळे या युवकाने अनोखा संकल्प घेतला असून सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे.

सध्या रावेर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वातावरण तापले आहे. सर्व उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. यातील काही बाबी या लक्ष्यवेधी ठरल्या आहेत. याच प्रकारे मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा येथील श्रीराम हरिभाऊ इंगळे या युवकाने केलेला अनोखा संकल्प चर्चेचा विषय ठरला आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील निवडून येतील तोपर्यंत म्हणजे ४ जून पर्यंत पायात चप्पल घालणार नसल्याचा संकल्प श्रीराम हरीभाऊ इंगळे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर पाटील यांच्या विजयासाठी आपल्या कुर्‍हा काकोडा गावासह मुक्ताईनगर मतदार संघात श्रीराम इंगळे हे प्रचार करत असून श्रीराम पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. आज श्रीराम इंगळे यांनी उमेदवार श्रीराम पाटील यांची घोडसगाव येथे भेट घेतली व त्यांना विजयी करण्याचा निर्धार बोलून दाखवला. श्रीराम इंगळे हे सध्या भर उन्हाळ्यातही अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता प्रचार करीत आहेत. या प्रकाराची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

Protected Content