जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पिंप्राळा येथील बाजार परिसरातून एकाची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी गुरुवारी ३० जून रोजी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अरुण दशरथ गवडे (वय-४१) रा. संत निवृत्तीनगर, पिंप्राळा हे आपल्या कुटुंबीय वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार २९ जून रोजी रात्री आठ वाजता सुमारास ते पिंपळा शहरातील बाजार घेण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९, सीइ ०७५३) ने बाजार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी बाजार पट्ट्यातील पूजा हॉटेल समोर दुचाकी पार्क केली होती. बाजार खरेदी केल्यानंतर ते दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी मिळाली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवारी ३० जून रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहे.