धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील बसस्थानकाजवळ चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास निंबा पाटील (वय-३९) रा. बांभोरी ता.धरणगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, कैलास पाटील हा तरूण बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास धरणगाव शहरात दुचाकीने जात असतांना धरणगाव शहरातील बसस्थानकाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या एक चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत कैलास पाटील हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर चारचाकी वरील चालक विक्रम मिश्रालाल ठाकूर रा. दोगानवा ता. धरणपूर मध्यप्रदेश हा वाहन घेवून पसार झाला.
दरम्यान, दुचाकीधारक कैलास पाटील याला तातडीने धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ् दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता कैलास पाटील यांनी धरणगाव पोलीसात तक्रार दिली.
त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चारचाकी वाहनावरील चालक विक्रम मिश्रालाल ठाकूर रा. दोगानवा ता. धरणपूर मध्यप्रदेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील करीत आहे.